महाराष्ट्र
मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांची बदली
पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली असून त्यांची मुंबई येथे बदली झाली आहे.
कृष्णा भोये यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचा कार्यभाग सांभाळल्यापासून पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील अवैधधंदे बंद करण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. त्यानी कठोर मेहनत घेऊन पोलीस निरीक्षक पदावर मजल मारल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांनी यापूर्वी रायगड, रत्नागिरी, भुसावळ बाजार पेठ, पिंपळगांव हरेश्वर येथे सेवा बजावली आहे. पोलीस निरीक्षक कृष्णा भोये याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.