उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर म्हाडा वासियांचे धरणे आंदोलन
धारणी (पंकज मालवीय) धारणी नगरपंचायतला वेळोवेळी २५ निवेदने देऊनही धारणी शहरातील म्हाडा कॉलनी येथील दलदल निवारण्यासाठी रस्ते व नाल्या करण्यासाठी सकारात्मक निर्णय न घेतल्यामुळे म्हाडा वासियांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.
2012 पासून वस्ती असून तेंव्हापासून त्या परिसरातील व शहरातील इतर भागाचे सांडपाणी त्याच परिसरात साचत असल्याने त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे त्या ठिकाणी तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे बरेचदा विविध आजरांची लागणही या परिसरातील नागरिकांना झाली. पावसाळ्यात हे पाणी नागरिकांच्या घरात जाते. तसेच सरपटणारे प्राणी साप व इतर प्राणी मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका उदभवत आहे. रस्ते नसल्याने पावसाळ्यात लहान मुले व महिलांना चालणे सुद्धा कठीण होते. त्याकडे नगर पंचायतचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्या परिसरातील नागरिकांनी नगरसेवकांसह मुख्यकर्यपालन अधिकारी व प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी धारणी यांना २५ निवेदने देऊन केला. परंतु त्यांना याबाबत कुठलीही आस्था दिसून आली नाही. त्यावर कुठलीही कार्यवाही अद्यापही झाली नाही. ज्या ठिकाणी आवश्यकता नाही तेथे नगरपंचायत मार्फत जुनी गटार नाली फोडून नवीन बांधत आहे परंतु या परिसरात गेल्या काही वर्षांपासून मागणी करूनही गटार व रस्ते नाही म्हणून या परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. आंदोलनस्थळी नगरपंचायत मुखकारी अधिकारी यांनी भेट देऊन म्हाडाची समस्या मार्गी लागल्या बाबतचे लेखी कागदपत्रे दाखविले व त्यानंतर त्यांनी आंदोलनकरी नागरिकांना आमरस पाजून समारोप केला. या आंदोलनामध्ये राजकुमार मोहोड, नीरज मालवीय, किरण मोहोड, गंगाधर नागोत, राजमुरारी मालवीय, हरिदास काणेकर, दिलीप पिंपळकर, गंगाधर नागोत, रोशन बारव्हाण, ज्ञानदेव येवले, विजेंद्र भावसार, जितेंद्र ठाकूर, विनोद पाल, संतोष खडसे इत्यादी नागरिकांनी आंदोलनां मध्ये सहभाग घेतला आहे.