दोंडाईचा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे निदर्शने व निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) आज दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता दोंडाईचा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रांताध्यक्ष ना. जयंतरावजी पाटील यांच्या आदेशान्वये, धुळे जिल्हा निरिक्षक अर्जुनरावजी टिळे, राज्याचे माजी मंत्री तथा जेष्ठ नेते नानासाहेब हेमंतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष किरण नाना शिंदे, शिंदखेडा तालुक्याचे नेते संदीप बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांच्यावर सूडभावनेने होत असलेल्या ईडीच्या कारवाईविरोधात भारतीय जनता पक्षाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या वाढत्या महागाई, चुकीचे धोरण तसेच महाराष्ट्र राज्यातील भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर भाजपच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून तपास यंत्रणांचा गैरवापर करण्याचे काम राज्यातील भाजपच्या वतीने होत आहे. शासकिय यंत्रणांचा गैरवापर या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपकडून होताना दिसत आहे.महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती इडी कार्यालयाला देउनही आजतागायत चौकशीचे धाडस तपास यंत्रणा करू शकली नाही. ही दडपशाही यापुढे थांबवावी या उद्देशाने आंदोलन करण्यात धरणे आंदोलन करून अप्पर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष डॉ कैलास ठाकरे, दों.कृ.उ.बा.समीतीचे माजी सभापती विठ्ठलसिंग गिरासे, युवासेना उपजिल्हाप्रमुख आकाश कोळी, शहराध्यक्ष एकनाथ भावसार, नगरसेवक सुनील चौधरी, अनिता ताई देशमुख, महीला विधानसभा क्षेत्रप्रमुख पुजाताई खडसे, ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अमितजी पाटील, भुपेंद्र धनगर, दिलीप पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख दिपक गिरासे, कय्युम, शहर कार्याध्यक्ष दयाराम कुवर, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण पाटील, किसान सेलचे गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देसले, युवक कार्याध्यक्ष कमलाकर बागले गिरधारीलाल रामरख्या, नंदु सोनवणे, युवक शहराध्यक्ष भुषण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रहीम मन्सुरी, युवक जिल्हा उपाध्यक्ष निखिल पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख दुर्गेश पाटील, वकील पाटील,अधिकार पाटील, शामकांत पाटील, आनंदराव पाटील, राजुदादा देशमुख, बिलाल बागवान, नाजीम शेख, रईस बागवान, संदीप थोरात, युवराज सोनवणे, योगेश पाटील, आबिद शेख, सचिन सोनवणे, हर्षल पाटील, ज्योतीताई मराठे, ललीता ताई बोरसे,भालती बोरसे, निर्मला राठोड, आरती पाटील, विनु राठोड, सुमन ठाकरे, वैशाली शिंदे, मंजुताई गुप्ता, संगिता गुप्ता, ज्योती देसले, मिरा ठाकुर आदी उपस्थित होते.