शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी येथे जलशुध्दीकरण व संरक्षण भिंत कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या हस्ते संपन्न
शिंदखेडा (जि.धुळे) : यादवराव सावंत, तालुका प्रतिनिधी
शिंदखेडा : तालुक्यातील तापी काठावर वसलेले सोनेवाडी गावात जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत जलशुध्दीकरण संयंत्राचे उद्घाटन व संरक्षक भिंतीचे भूमीपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, तालुकाप्रमुख गिरीश देसले, जिल्हा युवा सेना संघटक गणेश परदेशी, शहर प्रमुख संतोष देसले, तालुका समन्वयक विनायक पवार, सरपंच भिकुबाई सोनवणे, उपसरपंच हिराबाई भील, ग्रामसेवक एन.बी.देवरे, प्रवीण सोनवणे, देविदास भील, गुलाब कुंवर, प्रभाकर पाटील, भाऊसाहेब पाटील, विनोद पाटील, भाईदास भील, निंबा पाटील, अरुण पाटील, कैलास पिंपळे, नंदलाल पाटील, नाना भिल, चुनीलाल पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.हयावेळी जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांनी सांगितले की . तापी काठावर वसलेले सोनेवाडी गावातील लोकांनी कोरोणा काळात संकटांना सामना करावा लागला होता.सध्यस्थितीत विविध साथीच्या आजाराने त्रस्त झालेआहेत म्हणून जलशुध्दीकरण संयंत्राचे शुभारंभ झाला.हयातुन पाच रुपयांत वीस लिटर पाणी तेही शुद्ध मिळेल.शिवाय तापी नदीचे पाणी गावी येथे येते त्यासाठी संरक्षण भिंत आवश्यक होती.तसेच अध्यावत ग्रामपंचायत उभारणी साठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.हयावेळी विनायक पवार , कल्याण बागल यांनी मनोगत व्यक्त केले.