महाराष्ट्र
धुळे तालुक्यातील धाडरे गावात नवनाथ बाबा यात्रा उत्सव कार्यक्रम संपन्न
धुळे (करण ठाकरे) धुळे जिल्ह्यातील धाडरे गावात दिनांक २० ते २२ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत कोरोनाचे नियम पाळुन यात्रा उत्सव कार्येक्रम संपन्न झाला. सदर गावात सालाबादप्रमाणे याही वर्षी दोन दिवस तमाशाचा कार्येक्रम संपन्न झाला व तिस-या दिवशी कुस्तींची दंगल झाली.
या यात्रा उत्सवात परिसरातील नागरिकांनी देखील भागघेतला यात्रेत संसार उपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असत त्यामुळे या उत्सवात वेगळाच आनंद मिळतो यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे नवनाथ बाबांची ध्वज मिरवणूक संपूर्ण गावात होत असते. व गावातील व परिसरातील नागरिक अप आपल्या परिस्थिती नुसार ह्या ध्वज्याला पैशे लावत असतात नवसाला पावणारे नवनाथ बाबा म्हणून खास वैशिष्ट्य आहे यात्रेत कुठल्याही प्रकारचे अनुचीत प्रकार घडत नाही गावातील प्रमुख मंडळी नियोजन करत असतात.