राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते मंगरूळ, आसडी, रहिमाबाद, अन्वी येथे रस्ता कामाचे भूमिपूजन
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.23, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत तालुक्यातील पालोद जिल्हा परिषद सर्कल मधील मंगरूळ, आसडी, रहिमाबाद व अन्वी येथील रस्ताच्या विकासासाठी जवळपास 18 कोटी 67 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून या कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शनिवार ( दि. 20 ) रोजी संपन्न झाले. गावातील रस्त्याच्या कामांसाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावकऱ्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे भव्य स्वागत करून आभार व्यक्त केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, डॉ. संजय जामकर, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, पालोद सर्कल प्रमुख तथा नगरसेवक शंकरराव खांडवे, मधुकर गवळी, कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, रवींद्र राजपूत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता श्री. मराठे, अशोक चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मंगरूळ येथे -मंगरुळ – हट्टी -उंडणगांव रस्ता. प्रजिमा-४ किमी. 5.42 कोटी. मंगरूळ- हट्टी – उंडणगांव रस्ता सुधारणा करणे. 5 कोटी, रहिमाबाद येथे प्रजिमा ८ वरील रहीमाबाद गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे 1 कोटी,अन्वी येथे अन्वी -सारोळा रस्त्याची सुधारणा करणे 2.25 कोटी, आसडी येथे आसडी – रहिमाबाद – अन्वी रस्त्याची सुधारणा करणे 5 कोटी असे एकूण जवळपास 18 कोटी 67 लाख रुपयांच्या मंजूर रस्ता कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.
यावेळी पालोद सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, अन्वी सरपंच डॉ. दत्ता भवर,अनिल चापे, संजय सोन्ने, ग्रामसेवक अशोक महाकाळ, मंगरूळ येथे निवृत्ती वरपे, आंबदस बर्डे, शांताबाई कावले, बाळू ढोरमारे, नारायण ढोरमारे, शेख अकिल, रहिमाबाद सरपंच सुभाष नवल,जयराम चिंचपुरे, त्र्यम्बक गाढवे, योगेश शिंदे, गणेश नवल, माजी सरपंच विलास शिंदे, आसडी येथील विठ्ठल सुरडकर, फकीरबा सुरडकर, कैलास महाराज मिरगे , संतोष टेकाळे, भिकन मिरगे आदी गावकऱ्यांची उपस्थिती होती.