महाराष्ट्र

शिवचरित्र व्याख्यान माला आजपासून सुरुवात

धुळे (विक्की आहिरे) शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने शिवजंयतीच्या निमित्ताने तीनदिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. १७ पासून या तीनदिवसीय व्याख्यानमालेची सुरुवात होत आहे. पहिले पुष्प गणेश शिंदे गुंफणार आहेत. शिवजयंतीनिमित्त नॉर्थ पॉइंट इंग्लिश मीडियम शाळेच्या मैदानात शिवचरित्र व्याख्यानमाला होणार आहे.

सायंकाळी ७ वाजता शिवव्याख्याते प्रबोधन गणेश शिंदे ‘ छत्रपती शिवराय व आजचा युवक’ या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. तर १८ फेब्रुवारी रोजी शिवव्याख्याते बालाजी जाधव हे ‘ तुकोबांचा शेतकरी आणि शिवरायांचा युवक ‘ या विषयावर करणार आहेत. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त संस्थेच्या प्रांगणात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवकालीन घटनेवर आधारित नाटिका सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी अंतिम पुष्प गंगाधर बनवरे गुंफतील ते ‘ लढाया पलीकडचे शिवाजी महाराज ‘ या विषयावर मार्गदर्शन शिवचरित्र करतील. नागरिकांनी व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे चेअरमन सुभाष देवरे, प्रफुल्ल सिसोदे, उत्कर्ष पाटील, गुणवंत देवरे, शिवाजी पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश नंदन, प्राचार्य डॉ. जी. डी. पाटील, प्रदीप नवसारे आदींनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे