महाराष्ट्र

भटके विमुक्तांच्या एनजीओंची प्रशासकीय बैठक संपन्न

पुणे (प्रतिनिधी) आज शासकीय विश्रामगृह येथे भटके विमुक्तांच्या एनजीओंची प्रशासकीय बैठक भारत सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे आयोजन दादा ईदाते, Chairman, DWBDNC,Ministry of Social Justice and Empowerment, Government of India, आणि सी. एस.वर्मा, Director and CEO यांनी केले होते.

सदर बैठकीमध्ये भटके विमुक्तांच्या विषयावर काम करणारे संस्था आणि संघटनांचे म्हणणे आणि सुचना ऐकुण घेण्यात आल्या.
(1) केंद्र सरकारकडुन संपुर्ण देशातील भटक्या विमुक्तांच्या विद्यार्थ्यांना बार्टी/सारथी आणि महाजोतीच्या धर्तीवर शालेय स्तरापासुन ते पदवीपर्यंत शैक्षणिक शिष्यव्रुत्तीचे वाटप व्हावे, त्यामध्ये प्रामुख्याने UPSC/MPSC स्पर्धा परिक्षांच्या पूर्वतयारी साठी निधी मिळावा.त्यावर दादांनी येत्या 1/2 आठवड्यात 200 कोटीच्या निधीची तरतुद भारत सरकारने केल्याबाबतची घोषणा करण्यात येईल असे सांगितले.आणि सदर अंमलबजावणी याच वर्षी जानेवारी पासुन करण्यात येईल असेहि स्पष्ट केले.
(2) माॅबलिचिंग बाबत कडक कायदे करुन, अशा घटनांमध्ये राज्य सरकारने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करण्यास राज्य सरकारला सांगण्यात येईल असे दादांनी स्पष्ट केले.
(3) संपुर्ण भारतात भटके विमुक्तांना स्वतंञ राजकीय आरक्षण मिळावे अशी चर्चा करण्यात आली. याबाबत बोलताना दादा म्हणाले की, याबाबत भारत सरकारने ईदाते आयोग स्थापन करुन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार अहवाल सादर करण्यात आला आहे. याबाबत रोहिणी आयोगाने सुध्दा भारत सरकारकडे अहवाल सादर केलेला आहे.
(4) भटके विमुक्तांसाठी नविन घरबांधणीसाठी भारत सरकारच्या वतीने 1.20 (एक लाख वीस हजार) रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याचे दादांनी स्पष्ट केले.
(5) भारत सरकारच्या वतीने भटक्या विमुक्तांसाठी वैद्यकीय सुविधांसाठी लवकरच पाच लाख रुपये विम्याचे कवच अथवा वैद्यकीय स्वरुपात लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. सदर प्रशासकीय बैठकिला नंदकुमार गोसावी, पुणे, मुकुंद यदमळ आणि भटके विमुक्तांसाठी काम करित असलेल्या अनेक एनजीओ संस्था उपस्थित होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे