शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणुक शेवटच्या दिवशी 36 नामनिर्देशन पत्र दाखल ; 12 जुनला मतदान
कार्यकारी सहकारी सोसायटी च्या पंचवार्षिक सन 2022-2027 साठी निवडणुकीचा बिगुल वाजला
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या पंचवार्षिक सन 2022-2027 साठी निवडणुकीचा बिगुल वाजला असुन ९ ते १३ मे पर्यत 36 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम.एस.दशपुते यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शिंदखेडा शहरातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक प्रकिया सुरू असुन एकुण 1108 सभासद नोंदणी असुन त्यापैकी 782 कर्जदार सभासद निवडणूक प्रक्रिया साठी पात्र ठरले आहेत. सदर सोसायटीच्या सन 2022 ते 2027 हया पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 13 जागेसाठी 36 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जमा केले असून. त्यात सर्वसाधारण 8 जागेसाठी माळी वेडु दोधा, माळी मनोज दशरथ, मुसलमान जहागीर शेर हैदर, पठाण निमनखा गमीरखा, पाटील दिलीप आधार, पाटील मनिष कालीदास ( दोन अर्ज ), पाटील प्रकाश गुलाबराव, मराठे भुषण दिलीप, माळी युवराज नामदेव, माळी गोकुळ शिवदास, पाटील सदाशिव नागो, गिरासे रविंद्र रजेसिंग , चौधरी दगा तानका , माळी देविदास नारायण , भामरे रमेश चिंतामण (दोन अर्ज) , पाटील प्रविण वामन , पाटील प्रकाश नथ्थु , चौधरी अशोक रतन , चौधरी प्रकाश रतन ,अनुसूचित जाती जमाती 1 जागेसाठी कसबे राजथर मोतीराम , बोरसे बन्सीलाल पितांबर, 2 अर्ज, इतर मागास प्रवर्ग 1 जागेसाठी देसले सचिन चंद्रकांत , बागवान ईलीयास बशीर , माळी देविदास नारायण, पाटील चंद्रकांत दयाराम, 4 अर्ज, तसेच भ.वि.जा./ विमाप्र 1 जागेसाठी सुर्यवंशी दिनेश बंडु, भोई हिरालाल गोविंदा, दोन अर्ज आणि महिला प्रतिनिधी 2 जागेसाठी चौधरी चिंधाबाई पोपट, चौधरी मंजुषा श्रीराम, माळी शोभा दगा , देसले नलिनी राजेंद्र, मराठे आशाबाई भगवान, चौधरी उषाबाई प्रकाश , चौधरी मनिषा राकेश, असे 6 अर्ज दाखल केले आहेत.
छाननी 17 मे 22 दुपारी 12 वाजेपासून होणार आहे. विधीग्राहय नामनिर्देशन पत्राची 18 मे 22 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर अंतिम निकालाची यादी जाहीर केली जाईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम.एस.दशपुते यांनी दिली असून ह्यासाठी सचिव धनराज तुकाराम शिरसाठ तर शिपाई अमोल भगवान शिंपी हे परिश्रम घेत आहेत.एकंदरीत ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी चुरशीची होणार असली तरी राजकीय पक्षांचे वरीष्ठ नेते सक्रिय होणार की स्थानिकांना अधिकार देतील अशी चर्चा रंगली आहे.ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू असून माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल.