महाराष्ट्रराजकीय
रिव्हॉल्व्हर, तलवार आणि रॉडसह शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी केला हल्ला : रोहिणी खडसेंचा आरोप
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) याने हाता रिव्हॉल्व्हर तर पंकज कोळी याने हातात तलवार घेऊन आपल्याला धमकावले, तर छोटू भोई याने रॉडने आपल्यावर हल्ला केल्याची माहिती आज राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आज दिली.
काल रात्री हल्ला झाल्यानंतर त्यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या हल्ल्याची इत्यंभूत माहिती दिली. सुनील पाटील, छोटू भोई आणि पंकज पाटील हे तिन्ही आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक असल्याने रोहिणी खडसेंच्या आरोपांनी प्रचंड खळबळ उडाली आहे. तर असे शंभर हल्ले झाले तरी आपण डगमगणार नसल्याची रोखठोक भूमिका देखील त्यांनी घेतली आहे.