डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात साकारण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई
नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी घेतला आढावा
सिल्लोड : कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वत्रिकपणे उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
त्यानिमित्ताने महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सूचनेनुसार नगर परिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार ते पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, अनुयायांना बसण्यासाठी मंडप, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासह मिरवणूक मार्गासह संपूर्ण शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली आहे.
उत्सव समितीच्या वतीने मिरवणुकीत बेंजो पथक, फटाक्यांची आतिषबाजी यासह मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांना सरबत, मसाला दूध तसेच पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मंगळवार ( दि.12 ) रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह नगरसेवक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पणे करण्यात आलेल्या उपाययोजनेची पाहणी करून प्रत्यक्ष आढावा घेतला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, मनोज झंवर, जितू आरके, सत्तार हुसेन, रतनकुमार डोभाळ, बबलू पठाण, मुख्याधिकारी सय्यद रफिक, शिवसेना विधानसभा संघटक सुदर्शन अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल,शिवसेना उपशहरप्रमुख संतोष धाडगे, प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी, शेषराव आरके, युवासेनेचे शिवा टोम्पे, आशिष कुलकर्णी, दीपक वाघ, आशिष कटारिया, कैलास इंगे, राजेश्वर आरके, मनोहर आरके, निलेश सिरसाट, फहिम पठाण आदींसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्यांची उपस्थिती होती.