शिंदखेडा शहरासाठी ऐतिहासिक क्षण ; कै.सलीमभाई नोमानी यांच्या नेतृत्वात आजच्या दिवशी केले होते आंदोलन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या रेल्वे स्थानक आहे.शहरासह परिसरातील असंख्य प्रवासी व व्यापारी साठी उपयोगी असे रेल्वे स्थानक असुन मागील काळात जलद गाड्यांना शिंदखेडा येथे थांबा मिळत नव्हता. म्हणुनच रेल्वे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष कै.सलीमभाई नोमानी यांनी रेल्वे स्थानक परिसरात मोठय़ा संख्येने आपल्या सहकारी सोबत मोठे आंदोलन मागील वर्षी हयाच दिवशी (2 मार्च) रोजी करुन आंदोलन यशस्वी करित जलद गाडयाना थांबा मिळुन दिला होता.
कालांतराने आंदोलन कर्ते स्वर्गीय सलीमभाई नोमानी आपल्यात आज नसले तरी आज मात्र त्यांच्या आठवणीला उजाळा सहकारी समितीने केला असून आठवण दिवस पाडला आहे. मरावे परी किर्ती रुपी उरावे याप्रमाणेच आज सर्वच भाऊक झाले. त्यांच्या आठवणीबाबत भाजप रेल्वे प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष दादा मराठे यासह पदाधिकारी यांनी आठवण दिवस पाडत सहवेदना व्यक्त केल्या.