कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये : पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत
मलकापूर (करण झनके) मलकापूर शहर परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कर्नाटक राज्यामध्ये हिजाब वरून घडलेल्या घटनेच्या संबंधित सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याचे कारणावरून बऱ्याच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन संबंधित लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे. तरी सदर घटने संबंधित कोणीही आक्षेपाह व्हिडीओ पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये. अशी पोस्ट व्हिडिओ टाकल्यास टाकनारा व इतर संबंधित यास जबाबदार धरून त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
मलकापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये आज शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आज पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत बैठकीत सांगितले. शहरातील नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मलकापूर शहर पोलिस स्टेशन मध्ये संपर्क साधा तसेच जो कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न करेल त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.