डाॅ.महेश मोरेंच्या वरील खोटे कारवाई मागे घेण्यात यावी ; भिल समाज विकास मंचचे शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील तहसील कार्यालयात आज भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले यांना निवेदन देण्यात आले व निदर्शने करण्यात आली. कारण धुळे येथील महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश मोरे यांच्या वर कोवीळ लस बोगस प्रमाणपत्र देण्यात आले, असा खोटा आरोप लावून एक आदिवासी भिल समाजातील सर्व स्तरातील लोकांवर अन्याय झाला आहे म्हणून सदरचे निवेदन देण्यात आले.
जोपर्यत सदरील आरोप व निलंबित अधिकारी चे निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी अध्यक्ष दीपक अहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, जिल्हा अध्यक्ष बापुजी फुले, भाऊसाहेब मालचे, मन्साराम मालचे, गणेश सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, शाम मालचे, पांडु मोरे, सुनील सोनवणे, आप्पा भिल, राजेश मालचे, किरण चित्ते यांनी केले आहे. पुढील आंदोलनची दिशा ठरविण्यात येणार असे अध्यक्ष दिपक अहिरे यांनी सांगितले.