गुन्हेगारीमहाराष्ट्र

आयजींच्या पथकाचे शहरात धाडसत्र ; साखलांच्या होटेल शेजारील बोळीतील सट्टा पेढीवर ‘संक्रांत !

धुळे (स्वप्नील मराठे) धुळे शहरात फोफावलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी आयजींचे पथक सक्रिय झाले आहे. आज या पथकाने धाडसत्राला सुरुवात केली असुन पाला बाजारमधील माजी नगर सेवक गोविंद साखला यांच्या दंडेवाला बाबा हॉटेल पेढीवर छापेमारी केली.

आयजींच्या पथकाची छापेमारी होताच सट्टा पेढीवात्याची घाबरगुंडी उडाली आहे. धुळे शहर परिसारात काही वस्त्यांमध्ये हमरस्त्यावर खुलेआम सट्टा पढया जुगाराचे अड्डे सुरु झाले आहेत. त्याविरोधात आयजींचे पथक आक्रमक झाले असुन आज 10 ते 12 ठिकाणी छापे मारी केली जाणार असल्याचे कळते. आयजींचे पथक सक्रिय झाल्याने दोन नंबरवाल्याचे धाबे दणाणले आहेत. या पथकातील पोलीस निरीक्षक बापु रोहम, एपीआय जाधव, एएस आय बशिर जडवी, सचिन ढालवलकर, शमचंद्र बोरसो, कुणाल मराठे , मनोज दुसाणे, प्रमोद मंडलीकर यांनी ही कारवाई केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे