महाराष्ट्र
मालपुर गावात घंटागाडी दररोज नियमितपणे करते कचरा संकलन !
मालपुर (गोपाल कोळी) मालपुर गावात लोकसंख्याच्या मानाने शिंदखेडा तालुक्यात व दोंडाईचा पासुन ७ कि.मी अंतरावर असलेले हे मालपुर सर्वात मोठे गाव आहे. मालपुर गावाची लोकसंख्या १८ हजार ग्रामपंचायत मार्फत घंटागाडी प्रत्येक वाॅर्डात नियमितपणे कचरा संकलन करून गावात ६ वाॅर्ड आहेत. एका वाॅर्डातुन १ गाडी कचरा गोळा करण्याचे काम ही घंटा गाडी करते. जवळपास दररोज ७ गाडी कचरा नेण्यांचे काम घंटागाडी करते. नदीच्या पलीकडे खड्डा खोदून संकलन केले जाते ग्रामस्य मंडळी या बाबतीत खुप आंनदीत आहे. प्रत्येकांच्या दारी जाऊन कचरा संकलीत होतो.