छत्रपति शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी आरोग्य विषयक उपक्रमास प्रधान्य द्यावे : डी.वाय.एस.पी. सोमनाथ वाघचौरे
भुसावळ (प्रतिनिधी) येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यलयात काल दि. १६-२-२०२२ रोजी अगामी दि. १९-२-२०२२ रोजी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती सदस्य सर्व शिवजयंती मंडळाचे सदस्य व यापूर्वी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचे आयोजक तसेच प्रतिमा पूजन करणारे पदाधिकारी व विभागाचे पोलीस पाटील उपस्थित होते. सदर बैठकीत शासनाद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शन व सूचना देण्यात आले.
कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशांचे काठोकाठ पालन करावे.
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोठ्या प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात परंतु यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात आयोजन करू नये त्या ऐवजी कार्यक्रमाचा पक्षे पण केबल नेटवर्क व ऑनलाईन पद्धतीने करावे.
प्रभात फेरी बाईक रॅली किंवा मिरवणूक काढू नये त्याएवजी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याची कार्यक्रम आयोजित करावे व त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग चे पालन करत जयंती साजरी करावी.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती ज्या दिवशी आरोग्य विषयक कार्यक्रम व शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे त्याद्वारे कोरोना मलेरिया डेंग्यू इत्यादी आजारांवर उपाय योजना व प्रतिबंधक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी तसेच कार्यक्रमा ठिकाणी मास्क सॅनिटायझर वापरण्यास विशेष लक्ष द्यावे व कमीत कमी लोकांसह कार्यक्रम आयोजित करावे कुठल्याही प्रकाराचे डीजे चा वापर करू नये. अनाधिकृत आक्षेपार्ह बॅनर लावू नये अशी सूचना व निर्देश या बैठकीत देण्यात आले सदर बैठकीत भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गजानन पडघन तसेच सपोनि आकाश वानखेडे स्वप्नील नाईक रूपाली चव्हाण व सर्व गोपनीय अंमलदार उपस्थित होते.