सोयगाव मध्ये शिवसेनेचे वर्चस्व कायम नगरपंचायत विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध
सोयगाव (विवेक महाजन) सोयगाव नगर पंचायत विषय समिती निवडणूक प्रक्रिया पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदरील विषय समिती निवडणूक बिनविरोध पार पडल्याने महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे नेतृत्व असलेल्या सोयगाव नगर पंचायतीत शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहेत.
सोयगाव नगर पंचायतीच्या विषय समितीची प्रक्रिया गठीत करण्यासंदर्भात नगर पंचायत सभागृहात बुधवार (16) रोजी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली.
निवडण्यात आलेल्या समित्यांचे सभापती व सदस्य खालीलप्रमाणे आहे.
(1 ) सार्वजनिक बांधकाम समिती सभापती – काळे अक्षय विनायक, (2 ) स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती – कुडके गजानन सीताराम , (3) पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती – काळे सुरेखा प्रभाकर (4 ) नियोजन व विकास समिती सभापती – बोडखे संतोष कृष्णा (5) महिला व बालकल्याण समिती सभापती – दुतोंडे कुसुम राजू , महिला व बालकल्याण समिती उपसभापती- शेख शाहिस्ताबी रउफ यांची निवड झाली.
सोयगाव नगर पंचायत विषय समिती निवडणुकीत सर्व विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी सभापती सदस्यांचे युवानेते तथा सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे, उप विभागीय अधिकारी संजीव मोरे, मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई प्रभाकर काळे, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक संतोष बोडखे, हर्षल काळे, दिपक पगारे, संदीप सुरडकर, भगवान जोहरे, गजानन कुडके, अशोक खेडकर, लतीफ शहा, शेख शाहीस्ताबी, संध्याताई मापारी, कुसुम दुतोंडे, वर्षाताई घनघाव, ममताबाई इंगळे, शहा आशियाना, अशोक खेडकर,लतीफ शहा, अमोल मापारी, भगवान वारंगणे, राजू दुतोंडे, कदीर शहा, किशोर मापारी, विष्णू इंगळे, योगेश नागपुरे, विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, मोईन पठाण, मुबारक पटेल, संदीप चौधरी, शेख बबलू आदींची उपस्थिती होती.