महाराष्ट्र
जिल्हा परिषद शाळा सोयगाव येथिल इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी ची इंडस्ट्रियल विझिट
सोयगाव (जि.औरंगाबाद): विवेक महाजन तालुका प्रतिनिधी
सोयगाव : आज जिल्हा परिषद शाळा सोयगाव येथिल इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी श्रीमती प्रियंका कस्तुरे यांच्या मार्गदर्शना खाली इंडस्ट्रियल विझिट अंतर्गत सोयगाव येथिल जोहरे हॉस्पिटल ला क्षेत्रभेट दिली.
या मागिल ऊद्देश असा की विद्यार्थ्यांना हेल्थ केयर या विषयाची गोडी निर्मान करणे व व्यवसायिक दृष्टीकोन निर्मान करणे.डॉ मोहितकुमार सिताराम जोहरे सरांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या व स्पष्ट शब्दात करियर विषयी मार्गदर्शन केले.