महाराष्ट्रराजकीय
पेपरफुटीची प्रकरणं आढळल्यास शाळांची मान्यता काढणार : वर्षा गायकवाड
मुंबई (प्रतिनिधी) सध्या राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. कोरोनानंतर दोन वर्षांनंतर परीक्षा ऑफलाइन होत आहेत. अशात अनेक ठिकाणी राज्यात परीक्षा सुरु असताना गैरप्रकार आढळले. कोरोनामुळे सध्या शाळा तिथे केंद्र सुरु केले आहे त्यामुळे कॉपीचे प्रकरणात वाढ झाल्याचे आढळून येत आहेत. या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड महत्वाची घोषणा केली आहे.
परीक्षेदरम्यान पेपरफुटीची प्रकरणं आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाणार, असे स्पष्ट निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले. सोबत कॉपीचे प्रकरणे आढळल्यास यानंतर त्या शाळांना परीक्षा केंद्र दिलं जाणार नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. त्या विधानपरिषदेत बोलत होत्या.