महाराष्ट्र

अमेरिका-कॅनडा सीमेवर थंडीमुळे चार भारतीयांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेला लागून असलेल्या कॅनडाच्या सीमेवरून एक ह्रदयस्पर्शी घटना समोर आली आहे. थंडीमुळे येथे एका भारतीय कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये एका नवजात बाळाचाही समावेश आहे. मात्र हे प्रकरण मानवी तस्करीचे संभाव्य प्रकरण असल्याचे म्हटले जातेय. या घटनेवर आता परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी कुटुंबियांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

मॅनटोबा रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी गुरुवारी सांगितलं की एमर्सन परिसराजवळ कॅनडा-अमेरिका सीमेवर कॅनडाजवळ बुधवारी चार मृतदेह सापडले आहेत, ज्यात दोन मृतदेह प्रौढ व्यक्तींचे असून एक किशोरवयीन व्यक्तीचा आणि एक नवजात शिशूचा आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मृत्यू झालेल्या व्यक्ती भारतातून आले होते आणि कॅनडामधून अमेरिकेच्या सीमेतून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. सहायक पोलीस आयुक्त जेन मैक्लेची यांनी गुरुवारी सांगितलं, मी आज जी माहिती देणार आहे ती अनेकांना ऐकवणार नाही. ही एक खूप दुःखद घटना आहे. प्राथमिक तपासानुसार, असं वाटत आहे की या सर्वांचा मृत्यू गारठल्याने झालेला आहे.

मैक्लेची यांनी सांगितलं की, पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, हे चौघेही सीमेजवळच्या अमेरिकेच्या भागातून पकडण्यात आलेल्या एक गटातले होते. चारही मृतदेह सीमेपासून ९ ते १२ मीटरच्या अंतरावर आढळून आले आहे. अमेरिकी सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एमर्सन परिसरातून एक गट सीमा ओलांडून अमेरिकेत दाखल झाला आहे. एका प्रौढ व्यक्तीकडे लहान मुलाच्या काही वस्तू आहेत, मात्र या गटात कोणताही नवजात शिशू नाही.

यानंतर लगेचच सीमेच्या दोन्ही बाजूंना सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि दुपारी दोन प्रौढ व्यक्ती आणि एका नवजात शिशूचा मृतदेह आढळून आला. किशोरवयीन व्यक्तीचा मृतदेह मात्र काही वेळानंतर आढळला आहे. मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्लोरिडाच्या ४७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे लोक कोणाच्या तरी मदतीने सीमेच्या पलिकडे जाण्याच्या विचारात होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचा मृत्यू झाला. या परिसरात वारे वेगानं वाहत असून तापमान उणे ३५ अंश सेल्सियसच्या आसपास आहे. फक्त थंडीच नव्हे तर बराच काळ बर्फाळ हवा आणि अंधार यामुळेही त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी अमेरिका आणि कॅनडा सरकारकडून तात्काळ अहवाल मागवला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे