महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक प्रतापसिंग बोदडे यांची अखेर गंभीर आजारावर मात
मुक्ताईनगर (सचिन झनके) आज दिनांक २३फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आदरणीय प्रतापसिंगदादा बोदडे यांनी अखेर मृत्यूवर मात करून आपल्या मायभूमीत ते परतले. काहीच दिवसांपूर्वी भुसावळला ते प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्याने चेकिंग साठी दवाखान्यामध्ये गेले होते. आणि चेकिंग केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना लगेच एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा सांगितलं. तेव्हा बोदडे कुटुंबीयांनी लवकरच निर्णय घेऊन औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटल गाठले. आणि दादां जेव्हा औरंगाबादकडे निघाले तेव्हा बुलढाणा च्या घाटामध्ये त्यांना मरण यातना व्हायला लागल्या. परंतु दादा म्हटलं म्हणजे मोठ्या हिमतीचा माणूस.. ते हरले नाही त्यांनी औरंगाबादचे घाटी रुग्णालय अखेर गाठलेच.. आणि दिनांक १२ फेब्रुवारीला घाटी हॉस्पिटलमध्ये भरती झाले. आणि तेथून मग त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर दादांनी मृत्यूवरही मात दिली. त्यांच्या सोबत सावलीप्रमाणे उभे असणाऱ्या आमच्या मावशी मायावती बोदडे अहोरात्र त्याच्यासाठी झटत होत्या. त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीतील औरंगाबाद कर जनता दादांच्या तब्येतीसाठी खूप परिश्रम घेताना दिसली.
आंबेडकरी चळवळीतील चंदन रुपी लेखणीचा बापमाणूस की ज्यांच्या गीता शिवाय कुठलाच कार्यक्रम होत नाही. भीमराज कि बेटी मै तो जय भीम वाली हु हे गाणं आजही प्रत्येकाच्या ओठावर येते. एका पेक्षा एक दर्जेदार आणि उत्तम अर्थ असलेली गीत दादांनी लिहिलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांच्या तब्येतीसाठी आंबेडकरी जनता चिंतेत दिसत होती. त्यामुळे दादांच्या तब्येतीसाठी सर्वजण प्रार्थना करत होते. दिनांक १२ फेब्रुवारी पासून घाटी हॉस्पिटलमध्ये उपचाराला योग्य तो प्रतिसाद देत होते. पण त्यांना खरी हिम्मत देण्याचं काम हॉटेल मोर्य चे संचालक आयु दौलतराव मोरे(रिटायर्ड डी वाय एस पी), आयु सिद्धार्थ खरात (जॉईन सेक्रेटरी मंत्रालय महाराष्ट्र) यांनी २५ हजार रुपयांची आर्थिक निधी दादांसाठी पाठविला. कामगार संघटनेचे अध्यक्ष आयु विलास जगताप यांनी दादाच्या दवाखान्यातील मेडिकल बिलापासून तर राहण्याच्या उत्तम व्यवस्थेपर्यंत सर्व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या .विलास भाऊ जगताप यांची दादांविषयी ची एक बोलकी प्रतिक्रिया आहे, म्हणतात की महाकवी वामनदादा कर्डक मरण पावले त्यानंतर लोकांनी खुप गळा काढून आक्रोश केला, परंतु वामनदादा कर्डक यांचा जत्था पुढे नेणारे महाराष्ट्राचे ख्यातनाम कव्वाल प्रतापसिंग बोदडे यांची जिवंतपणे सेवा करण्याची संधी माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे.”ते दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
दादा सुद्धा औरंगाबाद करांचा या प्रेमामुळे भारावून गेले. त्याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणतात,”समाज माऊलीच्या प्रेमामुळेच माझा पुनर्जन्म झाला.” दादा प्रत्यक्ष आजाराशी झुंज देत असताना आयु विलास जगताप, आयु सिद्धार्थ खरात (जॉईन सेक्रेटरी मंत्रालय), आयु दौलतराव मोरे (होटेल मोर्य संचालक माजी डी वाय एस पी), आयु नागसेणदादा सावदेकर,डॉ.किशोर वाघ, आयु कुणाल वराडे, आयु राजाभाऊ शिरसाट, आयु अजय देहाडे, आयु मेघानंद जाधव, आयु शेखर साळवे, आयु अरविंद खरात, आयु देविदास येवले, आयु हेमंत मोरे, रेखाताई भारती, कला आई हिवराळे, आयु.संजय निवडंगे आदींनी मोलाचे सहकार्य केले. औरंगाबादच्या सर्व आंबेडकर प्रेमी कलावंत यांनी दादाच्या सेवा सुश्रुसेमध्ये काहीच कमी पडू दिली नाही. त्याबद्दल आंबेडकरी जनता औरंगाबाद कर यांचे मनापासून अभिनंदन करताना दिसून येत आहे.
दादाच्या या झुंजी मध्ये मोलाचा वाटा मायावती बोदडे यांनी उचलला आणि सावली सारख्या दादांच्या पाठिशी त्या अहोरात्र उभ्या राहत असतात. माऊलीच्या त्यागाला सुद्धा समाज प्रणाम करतोय. आज घडीला तब्बल दहा दिवसांनंतर दादांची तब्येत आता धोक्याबाहेर आहे आणि ते ठणठणीत आहेत. दादांची विचारपूस करण्यासाठी प्रसिद्ध लेखक दिपध्वज कोसोदे,पी एस युट्युब संचालक प्रवीण सरदार सर, भारतीय बौद्ध महासभा तालुका मुक्ताईनगर शाखेचे अध्यक्ष आयु शरद बोदडेसर, भारतीय बौद्ध महासभा शाखा जळगाव चे जिल्हा संघटक सुनील अढागळे सर, आयु उल्हास निकम( लेखक), आदींनी दादा ची भेट घेतली. “हा जख्मी देह आज मी, बुद्धास वाहिला ,माझा पुनर्जन्म मी ,डोळ्यांनी पाहिला.” या उक्तीचा प्रत्यय प्रत्यक्ष प्रतापसिंग बोदडे यांच्या जीवनात घडून आला. शेवटी दादा म्हणतात,” निघालो भीमारे नव्याच दिशेने, तुझ्या प्रेरणेने तुझ्या प्रेरणेने.”