शिंदखेडा येथील शिवसेनेचा जनता दरबारात विविध समस्यांवर चर्चा व निराकरण
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या उपस्थितीत झालेल्या जनता दरबारात गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांसाठीचा हक्काचे व्यासपीठ बनत असलेला शिवसेनेचा जनता दरबार संपन्न झाला.
या प्रसंगी तालुक्यातील सर्व सामान्य लोकांना तहसील कार्यालयात पोलीस स्टेशन कृषी विभाग, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, बॅकेत, ग्रामपंचायत आदी ठिकाणी किरकोळ कामासाठी वारंवार फिरावे लागते. तरी काही अधिकारी कडुन समस्या निराकरण करण्यात येत नाही. नाईलाजाने हताश होऊन घरी परतावे लागते. परंतु शिवसेनेने हाती घेतलेल्या दर सोमवारी आठवडे बाजार दिवशी सर्व स्तरातील सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेचे वारंवार होत असलेली त्रासातून मुक्तता मिळत आहे. येवढेच नाही तर हाती आलेल्या समस्या, तक्रारी चे जागेवर तातडीने निराकरण केले जाते. तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना जनतेच्या हितासाठी सेवा करण्याची संधी व जोश निर्माण होतो. म्हणुन सर्व सामान्य जनता खुष असल्याने समाधान वाटते. असे यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांनी आमचे प्रतिनिधी यादवराव सावंत यांनी विचारलेल्या माहिती द्वारे मत विषद केले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुका समन्वयक विनायक पवार, चंद्रसिंग ठाकूर, सईदखान पठाण, चतुर पाटील, सुशील चांदणे, धनराज पहिलवान, पत्रकार यादवराव सावंत, किस्मत पिंजारी, सत्तार पिंजारी, गोकुळ पाटील, दीपक बोरसे, चंद्रकांत बोरसे आदी उपस्थित होते.