मोताळा तालुक्यात होतेय राशन धाण्याची काळ्याबाजारात विक्री
मोताळा : तालुक्यामध्ये अनेक राशन दुकाने आहेत दुकानांमध्ये राशन धाण्याची मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारात विक्री होत असल्याची चर्चा परिसरातून आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोताळा तालुका हे बुलढाणा मध्ये येत असून मोताळा तालुक्यामध्ये अनेक दिग्गज राशन दुकानदार आहेत ते शासना कडून मिळणारे मोफत धान्य व महिन्यातून एकदा मिळणारे धान्य यापैकी एक धाण्य गहू तांदूळ महिन्यातून लोकांना एकदाच देतात. बाकीचे दुसरे धान्य सरळ काळ्याबाजारात विक्री होत असल्याची चर्चा जनतेत केली जात आहे. दुकानदारांनी महिनाभर दुकान उघडे ठेवायला पाहिजे परंतु तसे होतांना दिसत नाही.फक्त राशन एक किंवा दोन दिवस वाटप केली जाते. त्यानंतर दुकान बंद करून दुकानदार घरी जातात. परिणामी जनतेला असं वाटते की धान्य वाटप झालेली आहे. त्यामुळे ज्यांचे धान्य राहिले त्यांना पुढच्या महिन्यात भेटत नाही ते सरळ काळ्याबाजारात विक्री केली जाते. या बाबीला पुरवठा अधिकारी भोपळे देखील दुजोरा देत असल्याचे कळते त्यामुळे जनतेला धान्यापासून वंचित राहून भ्रष्टाचार वाढीस लागला आहे.
गोडाऊन कीपर व तेथील अधिकारी शासनाकडून येणारे धान्याची गोणी फोडून त्यातून एक दोन किलो काढून घेतात व तो जमा झालेला पूर्ण माल ट्रकची ट्रक काळ्याबाजारात विक्री केली जाते. गोणी मधून एक दोन किलो धान्य काढून ते 50 ची गोणी 48 किलोची करतात. व ती गोणी राशन दुकानदारांना वितरित करतात. त्यामुळे राशन दुकानदार देखील वजन मध्ये गडबड करून जनतेला कमी धान्य देत असल्याचे उघड झाले आहे. परिणामी जनतेने धान्य घेतांना वजनाकडे लक्ष द्यावे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी धान्याची होणारी चोरी व जनतेचे होणारे नुकसान याकडे ताबडतोब लक्ष द्यावे व संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी. अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.