लवकरच वाडी शेवाडी धरणाचे पाणी मदारी नदीत टाकण्यासाठी राष्ट्रवादीचे दिपक गिरासे यांच्या प्रयत्नाने कायम सुरू
दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील अनेक दिवसांपासून प्रलंबित शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असणारी मदारी नदी नदी जोड प्रकल्प पंचवीस वर्षापासून स्थगित आहे या विषयावर फक्त राजकीय पुढारी राजकारण करत आहेत.
गेल्या 10 वर्षापासून या विषयावर फक्त आणि फक्त जरी प्रामाणिक पाठपुरावा सह वरच्या लेवलवर हायलाईट तसेच चर्चेचा केला असेल तर राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक दादा गिरासे यांनी अनेक वेळा मंत्रालय मध्ये निवेदन देत पत्र व्यवहार केला तसेच स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेत प्रत्यक्ष जागेवर सर्वे केला त्यानुसार नकाशा तयार केला, गावोगावी शेतकऱ्यांच्या सभा केल्या आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, यांना मंत्रालयात निवेदन तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्या भेटीसाठी शंभर शेतकरी सोबत घेऊन चर्चा व मीटिंग केली.
या महत्वपूर्ण कामासाठी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्याचे विद्यमान जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा केली व पत्रव्यवहार करून पाठपुरावा या आधीही केलेला आहे. त्यानुसार मंत्री जयंत पाटील यांनी धुळे पाटबंधारे विभागाला पत्र दिले व धुळे अधीक्षक यांच्याकडून माहिती अहवाल मागितला असता त्यावर धुळे पाटबंधारे अधीक्षक यांनी त्यावर उत्तर देत ज्याकाळी वाडी शेवाडी डॅम चा नियोजित नकाशा तयार करण्यात आला. त्याकाळी घेतले गेलेले लाभदायक क्षेत्रातील काही गाव आरक्षित करण्यात आली होती म्हणून पुढील नवीन गावांना पाणी देण्यासाठी किंवा नवीन पादचारी खोदण्यासाठी मंत्रालय स्तरावर मीटिंग मीटिंग घेणे आवश्यक आहे तरच पुढील पाटचारी व नवीन गावांचा नकाशा मध्ये समाविष्ट करण्यात येईल व त्यानुसार अंदाजित खर्च रक्कम अहवाल सादर करता येईल असे स्पष्ट मत अधीक्षक यांनी सांगितले.
त्यावर त्यांच्याशी चर्चा करताना दीपक गिरासे यांनी विचारणा केली असता काही प्रश्न गिरासे यांनी पाटबंधारे संबंधित अधिकाऱ्यांशी केले त्यात आज वाडी शेवाडे धरणाचे दोघी उजवा कालवा व डावा कालवा नादुरुस्त आहेत त्यामुळे नकाशा मधील आरक्षित गावांना आजही धरणाच्या पाण्याचा लाभ घेता येत नाही व पावसाळ्यात हे पाणी नाईलाजास्तव बुराई नदीत सोडण्यात येते म्हणून या धरणाचा फायदा आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांना होत नाही , हे पाणी आवश्यक त्या वेळेस तात्पुरत्या स्वरूपात मदारी नदीमध्ये सोडण्यासाठी देण्यात यावे जेणेकरून येणारे मदारी नदीवरील सर्व गाव पाणीटंचाईग्रस्त असल्याने त्यांना वेळेवर पाणी मिळाले तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मदत होईल असे मत गिरासे यांनी मांडले. मदारी नदीवर वरझडी उगम स्थळापासून ते विरदेल पर्यंत जवळजवळ कॉंक्रीट बंधारे 15 ते 16 बांधलेले असून त्याचे खोलीकरण ही झालेले आहेत जरी आपण डावी पाटचारी पासून उगम स्थळापर्यंत जरी पाटचारी बनवून देण्यासाठी मदत केली तर मदारी नदी कायम वाहत राहील अशी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात त्यांनी सुचवले. अधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक उत्तर व प्रतिसाद दिला लवकरच मंत्रालयात राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांच्या माध्यमातून दिपक गिरासे व त्यांचे सहकारी तसेच काही शेतकरी जाऊन जलसंपदामंत्री महोदय यांच्याशी मीटिंग घेऊन आपण लवकर चर्चा करण्याचे त्यांनी सांगितले.