महाराष्ट्र
दहशत माजविणाऱ्या माकडाला पकडण्यात अखेर जळगाव वनविभागाला यश
दहा ते बारा ग्रामस्यांना घेतला होता चावा
न्याहळोद : धुळे तालुक्यातील न्याहळोद गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका वानराने नागरिकांना चावा घेत दहशत निर्माण केली होती. त्यामुळे न्याहळोद गावातील नागरिक या वानरांचा दहशती खाली वावरत होते. या संदर्भात जळगाव वनविभागाला कळविल्यांत आल्या नंतर दोन दिवसांपासून न्याहळोद गावात तळ ठोकुन होते अखेर काल त्यांना यश आले.
न्याहळोद या गावांमध्ये वानरांचा पुर्वी पासुन एका वानराने संपूर्ण गावा मध्ये थैमान घातले होते व पिसाळलेले माकड कोणते ते ओळखता येत नसल्याने त्यांस जेरबंद करण्यात अडचणी येत होते. बऱ्यांच ग्रामस्थांना चावा घेतल्याने अशी माहिती मोतिलाल सोनवणे, सावकार कोळी (पैलवान), रविंद्र भाऊ कोळी (जिल्हाध्यक्ष.वाल्या सेना ग्रुप धुळे) व ग्रामस्थांनी हि माहिती दिली.