बेंदवाडी येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी
वैजापूर : बेंदवाडी येथे सर्व प्रथम महाराणा प्रताप जयंती यांची साजरी करण्यात आली. सचिन ताजी यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला फुलहार वाहून महाराणा प्रतापांचा कार्याची माहिती दिली.
देशप्रेम, त्याग, बलिदान, संघर्ष या गुणांचे प्रतिक म्हणून महाराणा प्रताप भारतीय समाजासाठी श्रद्धा आणि अभिमानाचा विषय आहे. त्यांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यांसमोर मोगल साम्राज्याच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या शौर्याने परिपूर्ण असलेल्या वीर योद्ध्याची प्रतिमा साकार होते. ज़्याने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही कठीण संघर्ष केला. भौतिक सुख साधनांचा त्याग करीत त्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी केलेला सातत्यपूर्ण संघर्ष म्हणजे भारतीय स्वातंत्र्य युद्धातील सुवर्णाक्षराने लिहिलेले प्रकरण आहे. आज भारतात राष्ट्रीय भावना हीनतेच्या दिशेने अग्रेसर होताना दिसत आहे. अशा वेळी महाराणा प्रताप यांचे जीवन चरित्र आदर्श देणारे आहे. याच कारणामुळे मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या उपासकांसाठी ते नेहमीच संस्मरणीय आणि वंदनीय ठरले आहेत. असे सांगून महाराणा प्रताप जयंती फटाक्यांचा आवाजात जल्लोषात साजरी केली. यावेळी अर्जुन काहटे, पवन डोंगरगाव, अरुण गोमलाडू, परसराम काहटे, दादासाहेब पगार, विक्रम शिंदे, चेतन चरवंडे, गुरु गोमलाडू, कुणाल काकस, अजय व संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते.