राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेश वाटप
सिल्लोड (विवेक महाजन) नगर परिषद, ग्रामपंचायतीं मध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी ५ टक्के निधी राखीव असतो. त्यामुळे दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा निधी दिलाच गेला पाहिजे असे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे केले.
सिल्लोड नगर परिषद अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी ५ टक्के प्रमाणे जवळपास ३५३ पात्र लाभार्त्यांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शनिवार (दि.1) रोजी राखीव निधीचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
सरकारचा सर्वाधिक खर्च हा कोरोनाच्या संकटा वर होत असल्याने विकास कामांसाठी निधीची कमतरता भासत आहे. कोरोनाच्या संकटातही सिल्लोड नगर परिषदेने मागील वर्षी तसेच याही वर्षी दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा निधी दिला. येत्या काळात नगर परिषदेच्या माध्यमातून सिल्लोड शहरात दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन व क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेवक रुउफ बागवान, शेख बाबर, विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील, बेग चांद मिर्झा, शंकरराव खांडवे, शेख सत्तार, रतनकुमार डोभाळ, आसिफ बागवान, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन , राजु गौर, मतीन देशमुख, मनोज झंवर, अकिल वसईकर , जितु आरके, अनिस कुरेशी, मोईन पठाण, शेख मोहसिन, रईस मुजावर, बबलू पठाण आदींची उपस्थिती होती. यांच्यासह मुख्याधिकारी सय्यद रफिक, उपमुख्याधिकारी अजहर पठाण, न.प.तील प्रशासकीय अधिकारी अजगर पठाण, सुनील गोरडे, प्रकल्प समनव्यक देवेंद्र सूर्यवंशी, अलका सूर्यवंशी, सुनीता आरके, शेख अजीम, अनवर पठाण, गोरख धाडगे, दीपक दाभाडे , विलास तावडे आदींसह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.