महाराष्ट्र
डॉ अरूण दोडामनी यांना द डेंटल लीडरशीप पुरस्कार
धुळे (विक्की आहिरे) शहरातील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम दन्त महाविद्यालयाचे प्राचार्य भारतीय दंत परिषदेचे सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व इंडियन डेंटल अससोसिएशन धुळेचे अध्यक्ष डॉ अरुण दोडामनी यांना आशिया पॅसिफिक डेंटल एक्ससिल्लेन्स अवॉर्ड्स २०२२ या कार्यक्रमात द डेंटल लीडरशिप या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ दोडामनी यांना हा पुरस्कार दंतचिकित्सा शिक्षणाच्या विकासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ दोडामनी यांना जवाहर मेडिकल फाउंडेशनचे मा अध्यक्ष डॉ भाईदास पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, उपाध्यक्ष व आमदार कुणाल पाटील, संचालक डॉ ममता पाटील व सहसचिव संगीता पाटील यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.