लांडग्याच्या हल्ल्यात चार बोकड ठार तर दोन केले फस्त ; वढोदा येथील घटना
मुक्ताईनगर (सचिन झनके) (शैलेश गुरचळ) तालुक्यातील वढोदा येथे लांडग्यांने केलेल्या हल्ल्यात चार बोकडाचा मृत्यू झाल्याची घटना निदर्शनास आली. या घटनेनंतर पशु पालकांमध्ये भीती निर्माण झाली असून दि १५ फेब्रुवारी ला शाळीग्राम बोदडे यांच्या शेतात लांडग्याच्या हल्ल्यात १४ बकऱ्या मृत्यू झाल्या होत्या महिना भरात दूसरी घटना घडल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रीराम बळीराम पाटील यांच्या वढोदा गावालगत असलेल्या गट नं ३४५ /१ या शेतात नितीन शंकर लहासे यांनी बकर्याचा कळप करून कंपाउंड लावलेले होते. नितीन लहासे सकाळी आठ वाजेच्या सुमारास आले असता त्यांना आपल्या बकऱ्या मृत अवस्थेत दिसल्या त्यांनी लागेच गावातील श्रीराम पाटील, शिवसेनेचे इम्रान खान, हाजी उद्धव कोथळकर, अमोल तायडे, गौतम मोरे यांना बोलावून वन विभागाशी संपर्क करून अधिकारी कुऱ्हा वनपाल भावना मराठे व वढोदा वनरक्षक न्यानोबा धुळगंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता हा हल्ला लांडग्यानेच केला असल्याचे सांगितले. या हल्ल्यात बकरी पालकांचे खुपच नुकसान झाले आहे. तेथे 6 सहा बकऱ्या होत्या मात्र लांडग्याच्या हल्ल्यात चार बोकड मृत अवस्थेत पडलेले आहेत तर दोन आजू बाजूला पाहिले मात्र दिसून आले नाहीत तर दोन बोकड लांडग्याने फस्त केले असावेत असा तर्क नितीन लहासे यांनी सांगितले तर वनपाल मराठे यांनी पाहणी केली असता त्या दोन बोकड फरफटत नेल्याचे कुठे आढळून आले नसल्याचे सांगितले. हिंश्र प्राण्यांचा कल गाव वस्तीकडे वाढत असल्याने गेल्या महिना भरात दोन लांडग्याच्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्याने पशु पालकांमध्ये भीती निर्माण झाली असून वनविभागाने काही उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे.