महाराष्ट्रराजकीय

सोयगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी वर्षभरात तिसऱ्यांदा आरक्षण व सोडत जाहीर

सोयगाव (विवेक महाजन) एकाच नगर पंचायतीचे वर्षभरात तिसऱ्यांदा आरक्षण व सोडत जाहीर होत असल्याने राजकीय इतिहासात पहिल्यांदाच नोंद झाली आहे. उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत, मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, कार्यालयीन अधीक्षक ईश्वर शिमरे, किशोर मोरे, राजू जंजाळ आदींच्या उपस्थितीत सोयगाव नगरपंचायतच्या उर्वरित सर्वसाधारण झालेल्या चार जागांची सोडत आज तहसिल कार्यालयात श्रेया रावणे व पलक गायकवाड या मुलींच्या हस्ते चिठ्ठी काढून सोडत जाहीर करण्यात आली. त्यामुळे सोयगाव नगर पंचायत निवडणुकीचे पुन्हा वारे वाहू लागले आहे.

सोयगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी वर्षभरात तिसऱ्यांदा आरक्षण व सोडत जाहीर झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी राखीव झालेल्या चार प्रभागांच्या निवडणुकीला स्थिगिती आल्याने १७ पैकी १३ जागांसाठी दि. २१ मंगळवारी मतदान प्रकिया पार पडली. ओबीसी असलेल्या उर्वरित चारजागा सर्वसाधारण झाल्याने चार जागांची तिसऱ्यांदा दि. २३ गुरुवारी तहसिल कार्यालयात श्रेया रावणे व पलक गायकवाड या लहान मुलींच्या हस्ते सोडत काढण्यात आली यात प्रभाग क्रमांक एक -सर्वसाधारण महिला,प्रभाग क्रमांक दोन- सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्रमांक चौदा-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक सोळा–सर्वसाधारण पुरुष. दोन महिला दोन पुरुष अशा चारही जागा सर्वसाधारण होऊन सोडत निघाल्याने नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण तापणार आहे. नुकत्याच झालेल्या तेरा जागांच्या निवडणुकीचा अंदाज बांधत राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे