बुलढाणा येथे उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर
मोताळा (संभाजी गवळी) मध्ययुगीन काळापासून आधुनिक भारत घडेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे वंशज यांनी राज्याच्या विकासात योगदान दिले आहे. राज्यात व देशात छत्रपती शिवरायांचे छत्रपती संभाजी राजांचे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ पुतळे आहेत. पण महाराष्ट्र राज्यामध्ये एकही मंदिर नाही. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांचे मंदिर उभारले जाणार असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी मातोश्री संपर्क कार्यालय आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते ते म्हणाले.
स्वराज्याची निर्मिती राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीसाठी त्यांच्या आयुष्यभर जीवाचे रान केले तसे विशाल स्वराज्याच्या रक्षणासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी रक्षण केले. दरम्यानच्या काळात मोगल व आदिलशाही यांनी मंदिरे मोडण्याचा प्रयत्न केला. राजामुळे त्यांचे रक्षण झाले. धार्मिक स्थळाचा विकास झाला असेल तरी राज्यात एकही मंदिर उभारलेले नाहीत त्यामुळे बुलढाणा मध्ये भव्य दिव्य स्वरूपाचे एकत्र मंदिर निर्माण करण्याचा निर्णय घेतला. बुलढाण्यातील जनतेशी चर्चा करून जागा नियोजित करणार आहे. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असून बुलढाणा मध्ये मंदिर उभारणार युवकासाठी नवीन प्रेरणा असेल.