प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी साळुंखे ; तब्बल पावणे तीन वर्षानंतर मिळणार पूर्णवेळ शिक्षणाधिकारी
धुळे (स्वप्नील मराठे) जिल्हा परिषदेला तब्बल पावणे तीन वर्षांनंतर पूर्णवेळ प्राथमिक शिक्षणाधिकारी लाभले आहेत. राज्य शासनाने प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर राकेश साळुंखे यांची पदोन्नतीने नियुक्ती केली आहे. शिक्षण विभागात अधिकाऱ्यांचे संख्याबळ वाढल्याने गती येणार आहे.
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी पद गेल्या पावणे तीन वर्षांपासून रिक्त होते. सध्या प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून मनीष पवार सांभाळत आहेत. मनीष पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागातील कामकाजाची घडी व्यवस्थित बसविली आहे. आता पूर्णवेळ प्राथमिक शिक्षणाधिकारी राज्य आसनाने दिले. शिक्षणाधिकारी म्हणून राकेश साळुंखे यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. साळुंखे यांची पदोन्नतीने शिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी शासन निर्णय काढला असून, राज्यभरातील ५२ अधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे. शिवाय पदोन्नतीसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहेत.