बोरगांव येथील जिजाबाई बसंत भिल उर्फ जिजू बकरकीनला मिळाला न्याय
बोरगांव (प्रतिनिधी) येथील जिजाबाई बसंत भिल उर्फ जिजू बकरकीन, वयाच्या ७-८ वर्षांपासूनच बोरगावच्या शेती जंगल परिसरात बकऱ्या (शेळ्या) चारणे हा एकमेव व्यवसाय माहीत असलेली जिजू अत्यंत गरीब, शांत, मवाळ आदिवासी महिला.
रोज उठून दिवसभर बकऱ्या चारणे एवढंच ज्ञात असलेली जिजूला इतर काहीच माहीत नाही. कधी बाहेर गावाला जाणे नाही की कुणाच्या साखरपुडा लग्नाला सजली नाही. म्हणूनच ग्रामस्थ तिला प्रेमाने जिजू बकरकीन असेच म्हणतात. जणू काही तिचा जन्म फक्त बकऱ्या चारण्यासाठीच झाला असावा.
माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या आशिर्वादाने, आमदार काशिरामदादा पावरा, अशोकबापू कलाल यांच्या मार्गदर्शनाने अशा गरीब महिलेला बोरगावचे सरपंचांनी स्वतः च्या गाडीवर बसवून शिरपूर आमदार कार्यालयात नेले व सर्व कागपत्रांची जुळवाजुळव करून मासिक रु 1000 अनुदान वेतन (पगार) चालू केला व खऱ्या अर्थाने एका गरीब आदिवासी महिलेला न्याय मिळाला.
जिजूने कधी कुणाला सांगितलंच नाही की मला पगार चालू करून घ्या व तिला माहीत पण नाही की ती मासिक अनुदान घेण्यासाठी पात्र आहे. तिचा पती मागील 15-20 वर्षांपासून तिला वागत नाही. तिला परितक्त्या म्हणून संजय गांधी निराधार योजनेतून लाभ मिळेल म्हणून सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी तिला सांगितले. हे अनुदान तिला 15 वर्षांपूर्वीच चालू व्हायला पाहिजे होते. पण गरीब जिजाबाईला कोणी सांगितलेच नाही.
जिजू कडे कागदपत्रांची अपूर्णता. कुठल्या कागदाला काय म्हणता व त्याचे काय महत्व याची किंचितशीही कल्पना नसलेली जिजू कडे स्वतः चे पासपोर्ट फोटो पण नव्हते. जिजू ला जेव्हा पासपोर्ट फोटो लागतील म्हणून सांगण्यात आले व ते शिरपूर ला जाऊन काढून घे, तर ती म्हणाली शिरपूर ला गेलो तर माझ्या बकऱ्या उपाशी राहतील. बकऱ्या सोडून मला फोटो काढण्यासाठी शिरपूरला जाता येणार नाही. म्हणून गावाचे सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी तिचा फोटो मोबाईल मध्ये काढला व स्वतः फोटो स्टुडिओ मध्ये जाऊन जिजूचे पासपोर्ट फोटो काढले. जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आवश्यक होते.
बरेच डॉक्युमेंट फाटलेले, काही गहाळ झालेले, आधार लिंक नाही, मोबाईल नंबर नाही, आधार-मतदान-शिधापत्रिका नावात तफावत. बँक खाते नाही. अशा अनेक अडचणींना सामोरे जात शेवटी आमदार कार्यालयातील ‘विकास योजना आपल्या दारी’ व ‘भूपेशभाई पटेल फ्रेंड सर्कल’ टीमच्या मदतीने, तहसिलदार आबा महाजन यांची गरीबांप्रती तळमळ व बोरगावचे हुरहुन्नरी, शिक्षित, गोर गरिबांचा कैवारी सरपंच श्री योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या अथक प्रयत्नांनी जिजाबाई भिल उर्फ जिजू बकरकीन ला रु 1000 चे मासिक अनुदान वेतन 01 जानेवारी 2022 पासून चालू झाले व तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
शिरपूर तालुक्यातील गोर गरिबांसाठी स्वतः चे जीवन अर्पित केलेले, तालुक्यातील सर्व सामान्य गरिबांच्या मदतीसाठी नेहमी आपली सेवा देणारे अमरिशभाई पटेल व भुपेशभाई पटेल यांचे उपकार न विसरता येण्यासारखे आहेत अशीच चर्चा गरिबांचा मुखातून ऐकण्यास येते.