शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नेरी येथील म्हसावद चौफुली येथे राष्ट्रवादीच्या वतीने गांधी मार्गाने आंदोलन
जामनेर (ईश्वर चौधरी) महात्मा गांधींच्या फोटो समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बसून हल्याच्या निषेधार्थ आणि शरद पवार यांच्या समर्थनात जोरदार घोषणा देण्यात आल्या. हल्याला जबाबदार असलेल्या समाजकंटकावर कारवाई करण्यासंबंधीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, सरपंच दिनेश पाटील, राजू पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष किशोर खोडपे, राष्ट्रवादी पदवीधर संघ ता. अध्यक्ष आशिष दामोदर, जि.उपाध्यक्ष विलास राजपूत, युवक जि.सरचिटणीस सागर कुमावत, नेरी गट प्रमुख रुपेश पाटील ,कार्याध्यक्ष दत्तू साबळे, समन्वयक अर्जुन पाटील, राजेश पाटील, प्रशांत शेळके, निलेश खोडपे, अविनाश वाघ, सचिन पाटील, राहुल भोई, शुभम राजपूत, शिवाजी पवार, संजय महाजन, रामदास पालवे, अरुण पवार आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.