गुन्हेगारीमहाराष्ट्र
नवलनगर येथे सायरन आवाजाने चोरटे पसार ; स्टेट बँक एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
धुळे (विक्की आहिरे) जिल्हातील नवलनगर गावातील चौकात स्टेट बँक शाखेचे एटीएम मशीन चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी सायरनचा आवाज सुरू झाल्याने चोररट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. त्याचे पदरी निराशाच आली.
सायरन जोराने वाजत असल्याचे लक्षात येताच चोरटे घाबरले आणि तेथून त्यांनी पळ काढला. हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. तीन चोरटे एटीएम फोडताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले या आधारे तालुका पोलिस त्यांचा शोध घेत आहे. या अगोदरही दोन वेळा एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते या घटनेचा पुढील तपास तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील करत आहेत