धुळे : केंद्रातील भाजप सरकारने शेतक·यांच्या विरोधात असलेले तीन कृषी कायदे वापस घेण्याची घोषणा केली. त्या घोषणे नंतर धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी पुतळ्या समोर अतिशय आनंदाने जल्लोष साजरा केला. गेल्या एक वर्षा पासून देशातील विविध शेतकरी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकरी विरोधी कायद्या विरोधात विविध आंदोलने, रास्ता रोको, धरणे आंदोलन, निवेदन, निषेध मोर्चा या माध्यमातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष गेल्या वर्षभरापासून संघर्ष करत होती. सर्व शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कृषी कायदे परत घेण्या संदर्भात आंदोलने केली होती. आज या आंदोलना समोर केंद्राचे भाजप सरकार यांनी माघार घेऊन कायदे वापस घेतले. शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा विजय झाला. केंद्रातील भाजप सरकारने तीनही कृषी कायदे परत घेतल्याचा निर्णय घेतला असे समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते लगेच महात्मा गांधी पुतळ्या जवळ एकत्र येऊन महात्मा गांधी पुतळ्यास पुष्प हार अर्पन करुन अभिवादन केले. रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून, मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जय जवान जय किसान च्या घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, संजय बगदे, महेंद्र शिरसाठ, जितु पाटील, राजेंद्र चौधरी, निखिल मोमया, रईस काझी, मंगेष जगताप, संजय माळी, राज कोळी, राजेंद्र सोलंकी, राजेंद्र डोमाळे,स्वप्निल पाटील, हशिम कुरैशी, अॅड. तरुणा पाटील, सरोजिनी कदम, अस्लम खाटीक, अमीत शेख, ऋषीकेश देवरे आनंद पाटील, दिपक देसले, मयुर देवरे, रोहित पाटील,राईस काझी, उमेश महाजन,वामन मोहिते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.