शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत सोयगाव तालुक्यात बैठक संपन्न
सोयगांव (विवेक महाजन) मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान अंतर्गत सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात जामठी व आमखेडा या ठिकाणी पंचायत समिती गण निहाय बैठक घेण्यात आली. या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी पक्षनिरीक्षक विनायक सामंत, बाळकृष्ण ढमाळे, सोयगांव तालुका प्रमुख प्रभाकरराव काळे, सिल्लोड तालुका प्रमुख देविदास लोखंडे, श्रीमती दुर्गाताई पवार, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, रघुनाथ घडमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेचा विचार आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी घेतलेले जनहितार्थ निर्णय तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले विकासकामे घरोघरी पोहचवून येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे आवाहन पक्षनिरीक्षक विनायक सामंत यांनी केले.
बैठकीस सोयगांव नगरपंचायत अध्यक्षा आशाबी तडवी, शिवाप्पा चोपडे, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, दिलीप मचे, गुलाबराव कोलते, सोयगांव शहराध्यक्ष संतोष बोडखे, गटनेते अक्षय काळे, घाणेगाव सरपंच सुरेश चव्हाण, राधेश्याम जाधव, विलास राठोड, मोलखेडा सरपंच ज्ञानेश्वर वारंगणे, उपसरपंच गुलाब राणा, पिंपळवाडी सरपंच संतोष आळेकर, उपसरपंच कैलास मुळे, टिटवी सरपंच भागवत जाधव, नगरसेवक हर्षल काळे,दीपक पगारे,राजू घनघाव,राजू दुतोंडे,लतीफ शाह, शेख रउफ, भगवान वारंगणे, कन्हीराम जाधव, किसन सूर्यवंशी अनिल पाटील, गंगाधर सदाशिवे, ईश्वर शेळके, डॉ फुसे, भिका सोनवने, संजय आगे,दत्तू इंगले, अनिल ठाकरे, बाळू बेदवे, राजेंद्र गव्हाड, गजानन बडक, नथु पाटील, विजय वामणे, ज्ञानेश्वर आस्वार, दीपक रावळकर, संदीप मिसाळ, सलमान शेख,आनंदा ढगे,अनिल इंगळे, भारत तायडे,अरुण वाघ,कुणाल राजपूत,गोरख राजपूत,काशिनाथ मुळे, नदाताई आगे, सुरेखा तायडे,पूनम तळेले, भगवान जोहरे, शरीफ शाह आदी उपस्थित होते.