महाराष्ट्र
धुळे जिल्ह्यातील हट्टी खु. उपकेंद्राला पोलिओदरम्यान टीएचओंची भेट
धुळे (करण ठाकरे) पल्स पोलिओ अभियान सगळीकडे राबविण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील चे दुसाने प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत, उपकेंद्र हट्टी खु. येथे काल दुपारी तालुका आरोग्य अधिकारी (साक्री) व आरोग्य विस्तार अधिकारी ते शिंपी नाना यांनी भेट दिली. यावेळी हट्टी खु उपकेंद्र येथे ०-५ वर्ष वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ अभियान IT सुरू होते. यात दुपारी २ वाजेपर्यंत ७६ टक्के काम झाल्याचा शेरा दिला. या दरम्यान त्यांनी संपूर्ण उपकेंद्रांची पाहणी केली. यावेळी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जगदीशराजे शिंदे तसेच परिचारिका नंदा ओतारी, संजीवनी मुकुंदे, योगेश सिसोदे, आशा ताई उपस्थित होते.