शिंदखेडा येथे आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते 1 कोटी 86 लाखाचे कामांचे भूमिपूजन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा शहरातील नागरपालिके मार्फत विरदेल रोड लेंडी नाला येथे नाला बंदीस्त करण्याचे कामाचे भूमिपूजन व शिंदखेडा शहरातील सिद्धार्थ नगर येथील बुराई नदी पात्रावर सरंक्षण भिंत, काँक्रीट रोड व काँक्रीट गटार कामाचे भूमिपूजन माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आहे.
यावेळेस जयकुमार रावल यांनी सदर काम मुळे शिंदखेडा शहरात विकासात मोठी भर होणार आहे असे जयकुमार रावल यांनी सांगितले बऱयाच वर्षापासून लेंडी नाल्या मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी लेंडी नाला पूर्ण बंदीस्त होणार आहे फार महत्वाचे काम असून लवकरच ते काम पूर्ण होईल तसेच सिध्दार्थ नगर येथील बुराई नदी किनारी संरक्षण भिंत , काँक्रीट रस्ता व काँक्रीट गटार बांधकामाचे भूमी पूजन जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
या कामामुळे शिंदखेडा शहरातील बुराई नदी किनारी सुशोभीकरण होईल तसेच सिद्धार्थ नगर येथील नागरिकांना एक नवीन बायपास नवीन रस्ता देखील मिळणार आहे.
यावेळेस नगराध्यक्षा रजनीताई अनिल वानखेडे , जि. प.उपाध्यक्ष कुसुमताई व कामराज निकम तसेच गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष भिला पाटील, मुख्यधिकारी प्रशांत बिडगर, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, अशोक देसले, माजी प.स.सदस्य दयाराम माळी , माजी उपनगराध्यक्ष युवराज माळी, नगरसेवक चेतन परमार, विनोद पाटील, अर्जुन भिल, किसन सकट, किरण थोरात, अरुण देसले, सुनील चौधरी, दीपक अहिरे, उदय देसले, अशोक बोरसे, भाजपा शहर अध्यक्ष प्रविण माळी सह दिपक चौधरी, दादा मराठे, विनोद चौधरी, बाळासाहेब गिरासे , सोमनाथ जाधव, गुलाब सोनवणे, बबलू मराठे, बबन सकट, निलेश कपूरे, पप्पू अहिरे, विजु मोरे, अबू कुरेशी, दादाभाई माळी, भैय्या ठाकूर, गणेश जगदाळे, यांचासह लेंडी नाला येथील नागरिक व सिद्धार्थ नगर येथील नागरिक उपस्थित होते.