आमदार रमेशदादा पाटील यांनी अन्याय ग्रस्त आदीवासींचे प्रश्न विधानसभेत मांडल्याबद्दल वाल्या सेना वतीने आभार !
मंत्री छगन भुजबळ यांचा जाहिर निषेध
धुळे (गोपाल कोळी) ठाणे येथील आमदार रमेशदादा पाटील यांनी आज महाराष्ट्रात असणाऱ्या 47 जमातींपैकी 33 अन्याय ग्रस्त आदीवासी जमाती टोकरे, ढोर, मल्हार महादेव कोळी बांधव तसेच नोकरदार वर्ग यांच्या वरील शासनावतीने सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरूध्द विधानसभेत आवाज उठवल्याबद्दल खान्देशातील समस्त आदीवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळी यांच्या वाल्या सेना गृप महाराष्ट्र यांच्या वतीने आभार व्यक्त केले.
तसेच रमेशदादा पाटील यांना संपुर्ण पाठींबा दर्शवून आदीवासी कोळ्यांना द्वेष पुर्ण भावनेने डावलणा-या व हजारों आदीवासी कर्मचारी यांच्या नोक-यावर टांगती तलवार ठेवणा-या मंत्री छगन भुजबळ व कमिटी चा तीव्र शब्दात निषेध केला आहे. थोड्याच दिवसात अन्यायग्रस्त आदीवासी टोकरे, ढोर, महादेव, मल्हार कोळी आघाडीसरकारच्या या अन्यायाविरोधात नक्की रस्तावर उतरतील, असा इशारा आदीवासी वाल्या सेना गृप महाराष्ट्र राज्यतर्फे देण्यात आला आहे.