डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आयोजित वेट लिफ्टिंग व पावर लिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धा संपन्न
सोयगाव (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आयोजित वेट लिफ्टिंग आणि पावर लिफ्टिंग अंतर महाविद्यालय निवड चाचणी स्पर्धा २०२१-२०२२ या स्पर्धा वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालय येथे नुकतीच संपन्न झाली. याठिकाणी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील ९ खेळाडूंनी प्राविण्य मिळविले.
वेट लिफ्टिंग व पावर लिफ्टिंगमध्ये १५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. वेटलिफ्टिंगमध्ये ५५ किलो वजन गटामध्ये गणेश सोनवणे, प्रथम प्रितेश झालटे ; ६१ किलो वजन गटात प्रथम अशवजीत तायडे ६१, दृतिय क्रमांक आदित्य महाजन ; ६७ किलो वजन गटात प्रथम वैभव सोनवणे, द्वितीय विशाल कोळी ; ७३ किलो वजन गटात प्रथम शेखर तडवी, द्वितीय पंकज महाजन ; १०९ किलो वजन गटात प्रथम व विशाल शिरतुरे यांनी पावर लिफ्टिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत आकाश भोई, मयूर वानखेडे, मयूर सोनवणे या खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
यावेळी अजिंठा शिक्षण संस्थाचे अध्यक्ष रंगनाथ नाना काळे, सचिव प्रकाश काळे, प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार, डॉ. रावसाहेब बारोटे, डॉ. सलामपुरे, डॉ. शिवाजी अंभोरे, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. संतोष तांदळे, डॉ. सुशील जावळे, डॉ. निलेश गावडे, डॉ. राजू वानारसे, डॉ. सैराज तडवी, डॉ. भाऊसाहेब गाडेकर, डॉ. पंकज शिंदे, डॉ. भास्कर टेकाळे, डॉ. भोरे, प्रा परिहार, डॉ. विनोद बारोटे, डॉ. मगर, डॉ. पंकज गावित, प्रा. संतोष पडघन, पंकज साबळे, शंकर काळे, कमलेश काळे, उदय सोनवणे, राहुल चौधरी आदींनी अभिनंदन केले. या खेळाडूंना डॉ. निलेश गाडेकर व प्रा तुषार सपकाळे याचे मार्गदर्शन लाभले महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.