महाराष्ट्र
घारीवली गावातील विकास कामांची मनसेचे शहर संघटक योगेश पाटील यांनी केली पाहणी
घारीवली (बबलु मोरे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजुदादा पाटील यांच्या आमदार निधीतून घारीवली गावात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी आज मनसेचे शहर संघटक योगेश रोहीदास पाटील व स्थानिक ग्रामस्थ यांनी केली. तसेच ठेकेदार सोबत चर्चा करून कामात कुठे अडथळा नाही याची चाचपणी केली व कामाचा आढावा घेतला, अशी माहिती घारीवली येथील शाखा अध्यक्ष प्रविण भोईर यांनी दिली.