जिल्हा परिषदेच्या निधीतून विविध विकास कामांचे जि.प.सदस्य पुष्पाताई काळे यांच्या हस्ते उद्घाटन
सोयगाव (विवेक महाजन) तालुक्यातील आमखेडा गट येथील जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई काळे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या निधीतून विविध विकास कामांचे प्रामुख्याने तिडका येथील स्मशान भूमी संरक्षण भिंत पाच लक्ष रुपये, कवली येथील गावांतर्गत सिमेंट रोड पाच लक्ष रुपये, कवली ते मुरडेश्वर डांबर रोड सोळा लक्ष रुपये, रामपूर वाडी शाळा संरक्षण भिंत अडीच लक्ष, रामपूर तांडा शाळा दुरुस्ती पाच लक्ष ,मोती नाईक तांडा गावांतर्गत सिमेंट रोड पाच लक्ष, पानंद रस्ते, 15 वा वित्त आयोग गावांतर्गत पाईप लाईन व स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रोड 14 लक्ष, जरंडी येथील आरो प्लांट, आमखेडा नवीन शाळा खोली बारा लक्ष दहा हजार शाळा खोली दुरुस्ती 5 लक्ष, सोयगाव प्राथमिक शाळा शाळा खोली दुरुस्ती 5 लक्ष , (एकुण 60 लक्ष) इत्यादी कामांचे जि.प.सदस्य पुष्पाताई काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सरपंच गजानन ढगे, उपसरपंच कोलते नानी, ॲड.राजेश भैय्या गिरी, नगरसेवक राजेंद्र जावळे, मयूर मनगटे, भाजपा महिला शहराध्यक्ष कांबळे ताई, मुख्याध्यापक फुसे, गट विकास अधिकारी प्रकाश नाईक, बांधकाम विभाग जोशी व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.