महाराष्ट्र
सोयगाव बस आगारात मराठी भाषा गौरवदिन साजरा
सोयगाव (विवेक महाजन) सोयगाव बस आगारात परिवहन विभागाच्या वतीने रविवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मराठी भाषेचे अलंकार व महत्व विषद करताना नागरिकांना मराठीकडे वळण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास बागुल यांनी बोलताना सांगितले.व मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सोयगाव बस आगाराच्या वतीने जनजागृती करण्यासाठी प्रवाशांना मराठी भाषेचा व्यवहारात वापर वाढण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी कैलास बागुल (स.वा. नि.) यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन माधव पाटील तर आभार राहुल ठाकूर यांनी मानले. यावेळी रवींद्र हिरेकर, विनोद जाधव, रवींद्र डेरे, वानखेडे, गजानन सोनवणे, पठाण आदींची उपस्थिती होती.