पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू नागरिकांना धान्याचे वाटप
शिवभोजन केंद्राचे संचालक नमा शर्मा यांचा उपक्रम
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शहरातील गोर गरीब नागरिकांना अन्न धान्याचे वाटप भुसावळ शिवभोजनचे संचालक नमा शर्मा यांनी केले. तसेच नागरिकांना लाडू भरवून पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाचा जल्लोष करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कोरोना काळात अनेक नागरीकांच्या हाताचे काम गेले, काहींवर उपासमारीची वेळ आली. वाढदिवसानिमित्त बॅनर व जाहिरातीवर खर्च न करता एक हात मदतीचा हा उपक्रम राबवून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार १००%समाजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे असे शर्मा यांनी सांगितले.
या प्रसंगी माजी जिल्हाप्रमुख जगदीश कापडे, उपजिल्हासंघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धीरज पाटील, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, वरणगाव शहरप्रमुख निलेश ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, हेमंत खंबायत, उपशहर प्रमुख राकेश खरारे, जवाहर गौर, विभागप्रमुख अरुण साळुंखे, नाना मोरे, गोलू कापडे, अमजद खान, अमोल भालेराव, जेष्ठ शिवसैनिक गजानन निळे, शरद जोहरे, धीरज वरढोनकार, पवन मेहरा उपस्थित होते.