भुसावळ शहरात शिवभोजन योजना तिसऱ्या वर्षात पर्दापण
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) दिनांक २७ मार्च रोजी शिवभोजन योजना तिसऱ्या वर्षात पर्दापण करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमि शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन गोर-गरीब, गरजू बेघर लोकांना दिलासा म्हणुन कोरोना काळमध्ये मोफत दाल, चावल, भाजी २ रोटी असा जेवण व नंतर मात्र ५ रुपये प्रति किंमत करण्यात आली तसेच पार्सल सुविधा ही देण्यात आली असुन मात्र १० रूपयात दुकानात बसून शिवभोजन देण्यात येते ही योजना पूर्ण महाराष्ट्र मध्ये शुरू आहे.
कोरोनाच्या काळात भुसावळ शहरात शिवसेना आणि शिवसैनिकांनी पूर्ण कोरोना काळात लोकांना जेवणासह मदतीचा हात पुढे केले त्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि जळगांव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव जी पाटिल साहेब यांनी ही सेवा साठी भुसावळ शहरातील उमाकांत उर्फ नमा शर्मा यांना निवडले.आणि त्यांनीही ८० टक्के समाजकारण आणि २०टक्के राजकारणी “जनसेवा हीच ईश्वर सेवा” म्हणून आपल्या वरिष्ठांचे विश्वास सार्थक ठरवविण्याच्या प्रयत्न केले .आज शिवभोजन थाली मध्ये गोडवा म्हणुन बुंदी लाड़ू व गुलाबजामुन देण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या हस्ते माल्यापर्ण करुन शिवभोजन योजना चे तिसऱ्या वर्षी पर्दापणास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी मुक्ताईनगर चे छोटू भाऊ भोई, अफसर खान, वरंनगांव चे हिप्पी सेठ, शिवसेना शहर प्रमुख नीलेश महाजन, ऐड कैलास लोखंडे,अमजद खान कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत(नमा)शर्मा आदि उपस्थित होते.