ब्रह्माकुमारीतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वर्णिम भारताकडे’ कार्यक्रमाचे उद्या उद्घाटन
नंदुरबार (प्रतिनिधी) प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या माउंट आबू राजस्थान मुख्यालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विशेष:पंत्रप्रधानांच्या हस्ते `स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे` कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या गुरुवार दि. 20 जानेवारी, रोजी होणार आहे.
सन २०२२ हे वर्ष भारत सरकार संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करीत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ब्रह्माकुमारीज् संस्थेने `स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवकडून स्वर्णिम भारताकडे` या विषयावर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. ज्यासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक आणि पर्यंटन मंत्रालयाच्या सहकार्याने ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रामार्फत संपूर्ण देशात विविध कार्यक्रम आणि उपक्रमाांचे आयोजन करण्यात येईल. ब्रह्माकुमारीज् देशव्यापी कार्यक्रमाचे राष्ट्रीय उद्घाटन गुरुवार २० जानेवारी, २०२२ रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या मुख्यालय, शांतीवन, माउंट आबू येथील विशाल डायमंड सभागारात भारताचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने होईल.
याप्रसंगी पंतप्रधान कार्यक्रमास शुभेच्छा देखील देतील. कार्यक्रमास भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी आणि मान्यवर उपस्थित असतील. कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारीज् महासचिव बी.के. निर्वेर आणि कार्यकारी सचिव बी.के. मृत्युंजय यांनी केले आहे. उपरोक्त कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार असून देशभरातील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात केले जाऊन त्या-त्या ठिकाणी मोठ्या पडद्यावर लाखो साधक पाहतील. याबाबतीत माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ब्रह्माकुमारीज् संयुक्त मुख्य प्रशासिका ब्रह्माकुमारी संतोषदीदीजींच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ऑनलाईन लिंक: http://bkinfo.in/amritmahotsav असल्याची माहिती प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवाराचे उत्तर महाराष्ट्र माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे आणि नंदुरबार जिल्हा मीडिया समन्वयक महादू हिरणवाळे यांनी दिली.