भोगावती बचाव अभियान राबविणार : माजी नगराध्यक्ष सुनील काळे
भुसावळ (प्रमोद बावस्कर) वरणगाव शहरातील संपूर्ण सांडपाणी हे भोगावती नदी च्या चांगला पाण्यात मिसळत असल्यानेपावसाचे आलेले स्वच्छ पाणी हिरवट सांडपाणी मुळे पूर्ण भोगावती नदी प्रदूषित झाली आहे. आज प्रदूषित भोगावती नदीची पाहणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सादिक, भाजपा शहर अध्यक्ष सुनील माळी, शहराध्यक्ष आकाश निमकर, तालुकाध्यक्ष साबीर पोरीशी, शहराध्यक्ष डी के काटे, शेख शोएब जावेद शहा छोटे यांनी आज पाहणी केली.
यादरम्यान नदीच्या दोन्ही कडील भागातील सांडपाणी हे भोगावती नदीच्या चांगल्या पाण्यात मिसळल्याने संपूर्ण भोगावती नदी ही प्रदूषित झाली आहे. त्या साचलेल्या चांगल्या पाण्यात हे सांडपाणी मिसळल्याने दोन्ही बाजूच्या नागरिकांना दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरते आहे व अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अश्या प्रकारची तक्रार माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तसेच मुख्याधिकारी समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भोगावती नदी ही वरणगावची संस्कृतीचा देण आहे. नदी स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भोगावती बचाव अभियान सुरू करणार आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली आहे.
पावसाळ्यामध्ये भोगावती नदी च्या भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचत असते. चांगल्या पाण्यात नदीच्या अवतीभोवती वसाहतीचे सांडपाणी भोगावती नदी मिसळल्याने संपूर्ण चांगले पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रदूषित झालेल्या पाण्याची त्वरित विल्हेवाट लावावी तसेच भोगावती नदीच्या अवतीभवती वसाहतीतून येणारे सांडपाणी भोगावती नदीत न येऊ देता थेट किनाऱ्यावरून सांडपाणी प्रकल्प पर्यंत येणे आवश्यक आहे. दिपनगर वीजनिर्मिती केंद्रासाठी लागणारे पाणी हे नियमबाह्या पद्धतीने नदीपात्रातून पाईप लाईन गेल्यामुळे सांडपाणी हे वाहत नसून पाईपलाईनच्या अडथळ्यां मुळे संपूर्ण साचले आहे. ती भोगावती नदीतुन टाकलेली पाईप लाईन काढण्यात यावी त्यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद वरणगाव यांनी त्वरित भोगावती नदीच्या अवतीभवती गटारीचे बांधकाम करून सांडपाणी प्रकल्पापर्यंत न्यावे व दिपनगर वीजनिर्मिती केंद्राने टाकलेली नियम बाह्य पाईप लाईन काढण्यात यावी अन्यथा भाजपा लवकरच भोगावती बचाव अभियान सुरू करून आंदोलन सुद्धा करणार आहे, अशी माहिती यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली आहे.