दिनांक-११ आँगस्ट २०२२ नाशिक -प्रतिनिधि
नाशिक – येथील अन्न आणि औषध विभागाने (एफडीए) वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत तब्बल १ कोटींचे खाद्यतेल जप्त केले.
या कारवाईत मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि भेसळयुक्त दर्जाचे खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे.पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली आहे. नाशिकमध्ये उच्च प्रतीचे खाद्यतेल असल्याचे भासवून कमी दर्जाचे तेल ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचा संशय अन्न आणि औषध विभागाला होता.यावेळी त्यांनी छापा टाकून ही कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार, शिंदे गावाजवळच्या माधुरी रिफायनर्स कारखान्यावर एफडीएच्या पथकाने छापा टाकला. यावेळी तेलाच्या डब्यांवर फोर्टीफाइड तेलाचा उल्लेख प्रत्यक्षात होता.
मात्र, पल्स एफचा सिम्बॉल नसल्याचे समोर आले. या छाप्यात १ कोटी १० लाख ११ हजार २८० रुपयांच्या खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. दरम्यान, खाद्यतेल आणि वनस्पती तुपाचे ३२ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.